‘लोकसत्ता मार्ग यशा’चा चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन - २४-२५ मे रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्र
‘लोकसत्ता मार्ग यशा’चा चर्चासत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन
 
करिअरसाठीची शोधाशोध सुरू होते, ती शालेय जीवनापासूनच, पण या शोधाला खरा वेग येतो तो दहावी-बारावीच्या वर्षांमध्ये. या वेगाला जर चांगली दिशा मिळाली तर मग हा शोध अधिक सुकर होतो. याच विषयात विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा घेतली जाते. येत्या २४-२५ मे रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी , मुंबई येथे ही कार्यशाळा होत आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.