Loksatta Marg Yashacha 2018 / लोकसत्ता मार्ग यशाचा सेमिनार, ठाणे - १ आणि २ जून रोजी, सकाळी ९.४५ पासून
बारावी झाली; आता पुढे काय?  ठाण्यात टिप-टॉप प्लाझा येथे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
 
उच्चशिक्षणाच्या वेगळ्या वाटांचा ‘मार्ग यशाचा’द्वारे शोध
 
ठाणे : बारावीनंतर नव्याने येणाऱ्या अभ्यासक्रमांविषयी विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. उच्चशिक्षणासाठी साचेबद्ध अभ्यासक्रमापेक्षा विद्यार्थी काहीतरी अनोखे शिकून करिअरमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न पाहत असतात. मात्र या करिअरच्या अनोख्या क्षेत्राची वाट नेमकी कशी शोधावी यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज असते. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असले तरी या क्षेत्रातील वेगळ्या संधी आणि आव्हाने यांची माहिती विद्यार्थ्यांना गरजेची असते. यासाठीच येत्या १ आणि २ जून रोजी ठाण्यात टिप-टॉप प्लाझा येथे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
 
या कार्यशाळेचे उद्घाटन ठाणे सायबर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
 
या कार्यशाळेच्या निमित्ताने प्रशासकीय सेवा, अभियांत्रिकी, वैद्यकीय या क्षेत्राबरोबरच करिअरच्या वेगळ्या वाटा शोधण्याचे तंत्र अनुभवी मार्गदर्शकांच्या माध्यमातून ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
 
कुठे? - हॉटेल टिप टॉप प्लाझा, एलबीएस रस्ता, मुलुंड चेक नाका, ठाणे (प.)
 
कधी?  - १ आणि २ जून रोजी, सकाळी ९.४५ पासून
 
मार्गदर्शक
 
करिअरच्या दिशेने प्रयत्न करताना ताण कसा हाताळावा – मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे
 
करिअर निवड कशी करावी – करिअर समुपदेशक  डॉ. श्रीराम गीत
 
इंजिनीअरिंग, मेडिकल या क्षेत्रांतील करिअर नेमके कसे घडवावे – सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे, तीस वर्षांहून जास्त अनुभव असणारे आणि पीएच.डी. मिळवलेले  डॉ. जयंत पानसे.
 
स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी संवाद साधतील – दिग्विजय बोडके
 
करिअरच्या वेगळ्या वाटा चर्चासत्र – शेफ देवव्रत जातेगावकर, चित्रकार समीक्षक महेंद्र दामले, लेखक, दिग्दर्शक-अभिनेता अभिराम भडकमकर
 
https://www.loksatta.com/thane-news/loksatta-marg-yashacha-workshop-in-thane-1687454/